नांदेड,(प्रतिनिधी)- 7 नोव्हेंबर रोजी सागर यादव खून प्रकरणातील 28 आणि 29 क्रमांकाचे आरोपींनी पकडल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
7 नोव्हेंबर रोजी सराफा बाजार भागात शेकडो लोकांच्या समोर सागर यादव या यु्वकाचा खून झाला होता आणि त्याचा भाऊ मोनू यादव याच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता. पाहणाऱ्या लोकांनी काही एक मदत केली नव्हती. पाहणारे फक्त ओरडले असते तरी हल्लेखोर पळून गेले असते. पण या प्रकरणात सागर यादव या युवकाचा खून झाला आणि मोनू यादव हा गंभीर जखमी झाला पोलिसांनी काल दिनांक 6 डिसेंबर रोजी या प्रकरणातील 27 आणि 28 क्रमांकाचे आरोपी पकडले. त्यांची नावे साईनाथ फकीरा पवार (27) राहणार गायत्री मंदिर जवळ नांदेड गोपाळ नरसिंह कोरके (26) राहणार कालिजी टेकडी अशी आहेत.
सागर यादव खून प्रकरणात काही आरोपी अल्पवयीन विधी संघर्ष बालक आहेत. एकूण आरोपी संख्या 29 झाली आहे, तरी या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आज या प्रकरणातील 28 आणि 29 क्रमांकाच्या आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/11/24/सागर-यादव-खून-प्रकरणातील-22/