8 डिसेंबर रोजी वाहतुकीच्या मार्गात बदल 

नांदेड (जिमाका)- दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्‍या सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राखावी यादृष्‍टीने आदेशात नमूद केल्याप्रमाणे वाहतूकीच्‍या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्‍याबाबत अधिसूचना महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विनंती केल्‍यानूसार प्रसिद्ध केली आहे. ही अधिसुचना दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या कालावधीसाठी तात्‍पूरत्‍या स्‍वरुपात अंमलात राहिल तद्नंतर सदर अधिसुचना रद्द समजण्‍यात येईल.

राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 161 चंदासिंग कॉर्नर नांदेड ते नरसी तालुका नायगाव जड वाहनाच्या वाहतुकीस बंद राहील. या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग हा जड वाहनास नांदेड-मुदखेड-उमरी-धर्माबाद-कोंडलवाडी-बिलोली-तेलंगना येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनास नांदेड-मुदखेड-उमरी-कारेगाव फाटा-कासराळी-रुद्रापुर-मुतन्‍याळ-थडीसावळी-खतगाव-कोटेकल्‍लुर-शहापुर-सुंडगी-हनुमान हिप्‍परगा -देगलूर येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनांस नांदेड-कंधार-जांब-जळकोट-उदगीर मार्गे लातुर/कर्नाटक येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील. जड वाहनास नांदेड-कंधार-मुखेड-हिब्‍बट मार्गे खानापुर- देगलूर येण्‍या-जाण्‍यासाठी वाहतुकीस चालू राहील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *