
नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षणाची लढाई ही आता अंतिम टप्यात आली असून 80 टक्के लढा आपण जिंकलो आहोत. 24 डिसेंबर रोजी सरकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणारच आहे. मात्र मराठ्यांनो तुम्ही एकजुट राहा. तुमच्यात फुट पडू देऊ नका. जिव गेला तरी हरकत नाही, मी मागे हटणार नाही अशा शब्दच मनोज जरांगे यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मारतळा येथील सभेत दिला.
नांदेड जिल्ह्यातील वाडीपाटी (जिजाऊनगर), लोहा तालुक्यातील मारतळा, नायगाव आणि कंधार अशा चार ठिकाणी जरांगे यांच्या 8 डिसेंबर रोजी सभा पार पडल्या. मारतळा येथील सभेच्यावेळी सुरूवातीला जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. व्यासपीठावर आगमन होता. विद्यार्थींनींच्यावतीने औक्षण करण्यात आल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जरांगे पुढे बोलत असतांना म्हणाले की, आरक्षण मिळाल नाही तर आपल्या दहा पिढ्या बरबाद होणार आहेत. ज्यांना आरक्षणाच महत्व कळाल त्यांनी आरक्षण घेतल. मराठ्यांच्या लेकरांच्या न्याय हक्कांसाठी मराठा समाज एकवटला आहे. सध्या लोकसभा आणि विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आरक्षणाच्या बाबतीत काय चर्चा होईल यावर आता बारकाईने लक्ष देणे गरजेच आहे. अधिवेशनात कोण-कोण आपल्या बाजूने बोलतील त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना आपल्या दारात यायच आहे.
याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. 17 डिसेंबर रोजी अंतरवलीमध्ये समाजाची बैठक बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. कोणत्याही तरुणाने आत्महत्या करू नये, जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर हे आरक्षण कोणासाठी? ही तुमची ताकत मला बळ देते अशीच एकजुट आरक्षण मिळेपर्यंत कायम ठेवा. कोणत्याही पक्षात आरक्षण मिळेपर्यंत काम करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी मराठा समाजाला केले.
माझी तब्बेत साथ देत नाही त्यामुळे सेल्फीसाठी गर्दी करू नका
मी जिवाची पर्वा न करता फिरत आहे. 17 दिवस सुरूवातीला आणि नंतर 9 दिवस उपोषण केलय त्यामुळे माझी तब्बेत खालावली आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला तरीही देखील मी तुमच्यासाठी मैदानात उतरलो तुम्हीच माझ्या जीवाची काळजी घ्या अशी भावनिक साथ घालत त्यांनी तुम्ही एकजुट राहा फुट पडू देऊ नका. मला प्रत्येकाच प्रेम माझ्यावर असल्याची जाणीव आहे. पण माझी तब्बेत साथ देत नसल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. आयुष्य हे संपुर्ण समाजासाठी अर्पण केल आहे. त्यामुळे कोणीही माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.