नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रकमध्ये गोवंशाची चामडी घेवून जाणाऱ्या व्यक्तीसह ट्रक पकडण्यात आला आहे. ही कार्यवाही विमानतळ पोलीसांनी 7 डिसेंबरच्या सायंकाळी 6 वाजता केली.
पोलीस अंमलदार संभाजी उमाजी पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता उजव्या वळण रस्त्यावरील आनंदसागर मंगल कार्यालयासमोर त्यांनी ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.7028 ची तपासणी केली. त्यामध्ये 1986 गोवंशाच्या चामड्या भेटल्या त्यांची किंमत 6 लाख 95 हजार 100 रुपये आहे. तसेच ट्रकची किंमत 20 लाख रुपये आहे असा एकूण 26 लाख 95 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालक रफिक अहेमद शाहदुल्ला (42) रा.देगलूरनाका रोड नांदेड यास आरोपी करण्यात आले आहे. याविरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 5, 5(ए), 5(बी) आणि 11 तसेच सहकलम 429 भारती दंड विधान नुसार गुन्हा क्रमांक 404/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दोनकलवार हे करीत आहेत.
गोवंशाची चामडी घेवून जाणारा ट्रक पकडला