नांदेड(प्रतिनिधी)-माझी मटनाची भाजी का खाली म्हणून एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणात जखमी असलेला व्यक्ती 35 वर्षाचा आहे तर हल्ला करणारा व्यक्ती 70 वर्षाचा आहे.
दि.5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता नागेली शिवारातील मारोतराव देवराव गव्हाणे यांच्या आखाड्यावर जेवन होते. त्यावेळी गजानन बालाजीराव गव्हाणे (35) आणि मारोती देवराव गव्हाणे (70) यांच्या वाद झाला. त्यावेळी इतर लोकांनी सोडवा-सोडव केली तेंव्हा मी तुमची बघून घेतो असे म्हणत मारोती गव्हाणे आपल्या आखाड्यावर गेले. तेंव्हा काही जण त्यांची समजून काढण्यासाठी तेथे गेले तेंव्हा माझ्या भगोण्यातील मटनाची भाजी का खाली याचा राग मनात धरून बाजेवर ठेवलेल्या ऊस कापणीच्या कत्त्याने मारोती देवराव गव्हाणेने गजानन बालाजीराव गव्हाणे यांच्या डोक्यावर, मानेवर, मनगटावर, डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार करून त्यांचा जिवघेणाचा प्रयत्न केला. सुरूवातीला उपचार घेवून याबाबतची तक्रार 8 डिसेंबर रोजी देण्यात आली. त्यानुसार बारड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504, 506नुसार गुन्हा क्रमांक 84/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे हे करीत आहेत.
मटनाच्या भाजीसाठी जिवघेणा हल्ला