नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे संपुर्ण दुहेरीकरण आणि विद्युतीकरण विना विलंब करण्यात यावे. याच बरोबर अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. याचबरोबर नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामाला गती देण्यात यावी. याचबरोबर अनेक प्रश्न रेल्वेचे प्रलंबित आहेत ते सोडविण्यात यावेत असा ठराव मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी माजी खा.व्यंकटेश काब्दे, शंतनू डोईफोडे, डॉ.ए.एन.सिध्देवाड, डॉ.विकास सुकाले, नागनाथ देवरे, भाऊराव मोरे, डॉ.सिध्देश्र्वर सुर्यवंशी, ऍड.रामचंद्र बागल, सुमित गायकवाड,डॉ.बालाजी कोंपलवार, तिरुपती घोगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
माजी खा.व्यंकटेश काब्दे पुढे बोलतांना म्हणाले की, नांदेड विभागातील रेल्वेच्या कामासंदर्भाने नेहमीच रेल्वे प्रशासनाने दुजाभाव केला आहे. नांदेड-लातूर रोड रेल्वे मार्गाचा प्रश्न याचबरोबर नांदेड-बिदर या मार्गाचाही प्रश्न प्रलंबितच आहे, अहमदनगर-बीड-परळी या मार्गाचे कामही अत्यंत संथगतीने चालू आहे. अनेक गाड्या लुजू टाईम कमी करणे गरजे आहे. द.म.रे. विभाग मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नाकडे जाणीवपुर्व दुर्लक्ष करते. ज्येष्ठ नागरीकांसाठी सुविधा पुन्हा सुरू करण्यात याव्यात. उत्तर भारतात जाण्यासाठी गाड्या सुरू कराव्यात यासह अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा करून ठराव घेण्यात आला.