नांदेड(प्रतिनिधी)-राज्यसभेचे कॉंग्रेसचे खासदार धीरज साहु यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले. या छापेमारीत तब्बल 353 कोटी नगद रोकड सापडली. हा पैसा मोजत असतांना मशीनही बंद पडल्या. एवढा पैसा आला कोठून याची सखोल चौकशी करावी. या घटनेचा आम्ही निषेध करतो असे म्हणत देशातील कॉंगे्रसचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे मत भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला नांदेड लोकसभा संयोजक देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, दिलीपसिंघ सोढी आदींची उपस्थिती होती. यावेळी कंदकुर्ते पुढे बोलतांना म्हणाले की, झारखंड येथे राज्यसभेचे खासदार साहु यांच्या घरावर 6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने साहुसह इतर दहा ठिकाणी छापे टाकले. यात साहु यांच्या निवासस्थानी 353 कोटी रुपयांची नगद रोकड सापडली. हे पैसे मोजण्यासाठी अनेक मशीन मागविले होत्या मात्र यातील काही मशीन बंद पडल्या. यामुळे कॉंग्रेसने मागील 60 वर्षापासून किती भ्रष्टाचार केला हे जगाला दिसून येत आहे. युपीए सरकारच्या 10 वर्षाच्या कॉंग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा, टुजी घोटाला, कॉमवेल्थ घोटाळा हा घोटाळा जनतेने अद्यापही विसरला नाही. याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचा हप्ता मागितला होता. हे कॉंगे्रसच्या राजकारणाची पध्दत आहे. देशाला बुडविण्यामध्ये कॉंगे्रसचा हात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
देशाचा विकास केवळ भाजपच करू शकते हे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निकालावरून दिसून येते. याबरोबर देश म्हणजे स्वत:ची वैयक्तीक एटीएम मशीन असल्याचे कॉंगे्रसच्या नेत्यांनी लुटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्र्वास ठेवून तीन राज्यात सत्ता भाजपची सत्ता आली. मोदीच्या गॅरंटी व विश्र्वास जनतेने ठेवला. जिथे भाजपची सत्ता असते तेथे विकासाची म्हणजेच मोदीची गॅरंटी असते असे मत महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी व्यक्त केले.
साहुच्या माध्यमातून कॉंग्रेसचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर -दिलीप कंदकुर्ते