नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतूसे यासह एक दुचाकी असा 1 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ, विलास कदम, रणधिर राजबन्सी, धम्मा जाधव, गजानन बैनवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार आणि हनुमानसिंह ठाकूर यांच्या पथकाला नाळेश्र्वरजवळ पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला नांदेड-नाळेश्र्वर रस्त्यावर एक विना नंबरची दुचाकी येतांना दिसली. त्यावर दोन स्वार होते. त्यांची नावे आकाश व्यंकटी वाघोळे(25) रा.नाळेश्र्वर आणि सय्यद वसीम सय्यद कासीम (32) रा.दुल्लेशाह रहेमाननगर वाघी रोड नांदेड अशी आहेत.त्यातील सय्यद वासीमच्या कंबरेला एक अग्नीशस्त्र(गावठीकट्टा) होता. सोबत दोन जीवंत काडतुसे सुध्दा होती. पोलीसांनी अग्नीशस्त्र, जिवंत काडतुसे आणि दुचाकी गाडी असा 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघांकडून जप्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पकडली; दोघांविरुध्द गुन्हा दाखल