नांदेड(प्रतिनिधी)-एका 15 वर्षीय बालकाला खंजीरने मारण्याची भिती दाखवून पैशाची मागणी केल्यानंतर त्या बालकाने आपल्या घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगितला. परंतू या प्रकरणाची तक्रार भितीमुळे त्यांनी उशीरा दिली. या प्रकरणात अटक असलेल्या 19 वर्षीय युवकाला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी एक दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय बालकाला मागील दोन महिन्यापासून विक्की लोट आणि आदु जाधव हे दोघे खंजीरने मारण्याचा धाक दाखवत असत आणि आम्हाला पैसे आणून दे असे म्हणत असत. त्या बालकाने घरी जाऊन वेळोवेळी आईच्या लॉकरमधून गुपचूप 2 हजार रुपये त्यांना दिले. परंतू त्यांची मागणी चालू राहिली. 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास हा लहान बालक मंदिराकडून जात असतांना त्याला पकडून या दोघांनी पुन्हा खंजीरचा धाक दाखवून मारून टाकण्याची भिती दिली आणि आम्हाला खर्चासाठी पैसे आणून दे असे सांगितले. हा बालक त्या दिवशी घरी गेला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. दि.12 डिसेंबर रोजी आईसोबत येऊन या बालकाने तक्रार दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 386, 387 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 565/2023 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. 12 डिसेंबर रोजी पोलीसांनी या प्रकरणातील एक देवेंद्र उर्फ विक्की नरेश लोट (19) रा.दिलीपसिंघ कॉलनी नांदेड यास अटक केली आज 13 डिसेंबर रोजी न्यायालयाने देवेंद्र उर्फ विक्कीला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अल्पवयीन बालकाकडून खंडणी घेणारा 19 वर्षीय युवक पोलीस कोठडीत