नांदेड(प्रतिनिधी)-बायकोने दारु पिण्यास विरोध केल्यानंतर नवऱ्याने बायकोवर हल्ला करून तिचा खून केल्याचा प्रकार सावरगाव ता.देगलूर येथे घडला आहे.
यादवराव भिमराव लक्कावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीचे लग्न इरवंत शंकरराव पाटील रा.थडीसावरगाव याच्यासोबत झाले होते. इरवंत पाटीला दारु पिण्याची सवय होती आणि त्यांची पत्नी अनुसया हिला ते आवडत नसे यावरून नेहमीच त्यांच्या घरात वाद होते. दि.11 डिसेंबरच्या रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दारु पिण्याच्या कारणावरुन अनुसया आणि इरवंत पाटील यांच्यामध्ये वाद झाला. तेंव्हा इरवंत पाटीलने तिच्या उजव्या डोळ्यावर, उजव्या हातावर, पाठीवर, मांडीवर आणि डोक्यात मारुन तिला जिवे मारले आहे.देगलूर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा क्रमांक 511/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोेलीस उपनिरिक्षक फड यांच्याकडे देण्यात आला आहे.
दारु पिण्यास विरोध करणाऱ्या बायकोचा खून