नांदेड(प्रतिनीधी)-परीक्षा विभागाने नेमून दिलेल्या सेंटर तात्काळ हलवण्याचा पहिलाच प्रकार स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड च्या सलग्नित असलेल्या श्री शिवाजी लॉ महाविद्यालय परभणी चा प्रकार आहे.विद्यार्थिनी सेंटर बदल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्याची धाव पळ झाल्याने तेथील काही विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व लक्षात घेता मा.नेटके सर परीक्षा विभाग प्रमुख यांच्या कडे रीतसर तक्रार केली आहे.त्या तक्रारी अर्जात मध्ये असे नमूद केले की,
दिलेल्या सेंटर परिक्षा हिवाळी 2023, अभ्यासकाच्या संपूर्ण परीक्षाचे सेंटर ही शिवाजी लॉ. कॉलेज असताना अचानकच झानोपासक महाविद्यालय परभणी असे सेंटर केले आहे. ह्या बदलाने पत्र काढून आर डी देशमुख (प्राचार्य) यांनी उद्या परिक्षार्थी विद्यार्थी यांच्या परिक्षा झानोपासना महाविद्यालय परभणी येथे होणार आहे हे सूचना पत्र काढले ज्यांनी वाचले त्यांची हेलसांड झाली आहे.विद्यार्थांना नवीन सेंटर शोधणे कठीण जाणार आहे त्या त्रास विदयार्थी आणि पालक यांना होणार आहे अनेकांना ते महाविद्यालय शोधणे आहे.नवीन झालेले सेंटर माहीत देखील न तरी विद्यार्थ्याची हेळसांड होवू नये त्या करीता प्राचार्य व परिक्षा विभाग यास कळवून त्यांची सुचना नोटीस रद्द करून जैसे थे परिक्षा घ्यावे विद्यापीठाचा भलताच कारभार प्रवेश पत्रावर सेंटर एक,परीक्षा होणार दुसरीकडेच अशी चर्चा विद्यार्थांन मधून ऐकण्यास मिळत आहे.
ज्या विद्यार्थ्यांनचे परीक्षा सेंटर श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी आहे असे हॉल टिकीट प्रदान झाले असताना सुद्धा असे परिक्षा सेंटर अचानक बदले आहे तरी ते रद्द करून विदयार्थीना न्याय दयावा अशी मागणी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी माधव मेकेवाड,जयभारत सुर्यवंशी यांनी केले आहे.