नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू पदी विद्यापीठ परिसरातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाच्या संचालिका प्रो डॉ. माधुरी देशपांडे यांची प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून निवड झालेली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. ते दि. १४ डिसेंबर रोजी रुजू झाल्या आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ (सुधारित नियम अॅक्ट नं. VI ऑफ २०२३ दि. ११ जानेवारी २०२३) नुसार त्यांची निवड केलेली आहे.
प्रो. माधुरी देशपांडे या विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलामध्ये कार्यरत आहेत. नवीन कायम कुलगुरू या पदाची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे नवीन कायम कुलगुरू येईपर्यंत किंवा प्रभारी कुलगुरू असेपर्यंत ते प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
या त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. किशोर गंगाखेडकर, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. दिपक बच्चेवार, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंढे, हनमंत कंधारकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा प्र.संचालक डॉ. मनोज रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील संचालक, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून सुभेच्छा दिल्या.