‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये दि. १४ डिसेंबर रोजी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठातील क्रीडा मैदानावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड विभागाच्या विभागीय रल्वे मॅनेजर श्रीमती निती सरकार यांच्या हस्ते थाटात पार पडले.

 

यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच देविदास जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंकुश पाटील, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या रेफ्री बोर्डचे चेअरमन पी.एस. पंथ, एआययू नवी दिल्ली येथील स्पर्धा निरीक्षक डॉ. राजेशकुमार डाका, प्रभारी कुलसचिव व्यंकट रामतीर्थे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी.एन. मोरे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश बेम्बडे, माजी क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, क्रीडा मंडळ सदस्य डॉ. महेश वाकरडकर, डॉ. विक्रम कुंटूरवार, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, प्रा. अशोक वाघमारे, डॉ. पवन पाटील, क्रीडा विभागाचे प्र.संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.

 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत घेण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या पाच राज्यातील विद्यापीठातील खेळाडूंनी मान्यवरांना वंदना दिली. मशाल पेटवून हवेमध्ये फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. असे घोषित करण्यात आले.

 

अध्यक्षीय भाषणांमध्ये विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सहभागी खेळाडूंना प्रेरणा दिली. क्रिकेट आणि कबड्डी सारखेच व्हॉलीबॉल या खेळालाही भविष्यात उंची गाठता येईल. अशी अशा व्यक्ती केली.

 

या सर्व स्पर्धा सुरळीत चालण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आयोजन स्वागत व शिष्टाचार समिती, तक्रार निवारण समिती, मैदान समिती, तांत्रिक समिती, प्रशिक्षक व खेळाडू निवास समिती, वाहतूक समिती, पात्रता समिती, उद्घाटन व उध्दघोषक समिती, स्वच्छता व सुशोभीकरण समिती, पाणी व्यवस्थापन समिती, भोजन व चहापाणी समिती, वित्त व लेखा समिती, प्रसिद्धी समिती, पंचव्यवस्था समिती, कार्यालय कामकाज समिती, सुरक्षा समिती, वैद्यकीय समिती, निमंत्रण पत्रिका छापाई व वाटप समिती इत्यादी समित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांचाळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप माने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *