नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल (मुले) संघाने साखळी सामन्यात गुजरात टेकनॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद व कोटा विद्यापीठ संघाचा पराभव करून आगेकूच केली आहे. यजमान संघाने विजय मिळविल्याने बाद फेरीत दाखल होण्याच्या आशा बळावल्या आहेत.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेचे आयोजन दि.१४ ते १८ डिसेंबर या दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाल्यानंतर साखळी फेरीचे सामने सुरु करण्यात आले. त्यामध्ये यजमान विद्यापीठाने साखळी फेरीत दोन्ही सामन्यात सहज विजय मिळवला.
विविध मैदानावर झालेल्या साखळी सामन्यात विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ, जयपूर, आर.टी.एम. विद्यापीठ, नागपूर, सोमय्या विद्य विहार मुंबई, आर.डी.व्ही.व्ही. जबलपूर, संजय गोडवंट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्री
या स्पर्धा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अंकुश पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. महेश वाखरडकर, डॉ. भास्कर रेड्डी, संजयसिंघ ठाकूर, डॉ. निहाल खान, अनिरुद्ध बिराजदार, डॉ. सचिन चामले, डॉ. सतीश मुंडे आदी परिश्रम घेत आहेत.
नांदेड विद्यापीठ खेळाडूची सांघिक कामगिरी
यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संघातील खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. विशाल वगरे, मंथन शिंदे, नदीम पठाण, गणेश चव्हाण, अजय गायकवाड, एजाज शेख आदी खेळाडूंनी विविध कौशल्याचा सुरेख वापर केला. मार्गदर्शक डॉ. कैलास पाळणे, सहाय्यक मार्गदर्शक डॉ. विजय हांडे, संघ व्यवस्थापक डॉ. विक्रम कुंटुरवार यांनी खेळाडूंना मौलिक सूचना केल्यामुळे विजय मिळवता आला.