नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती वाय.जी.खोब्रागडे आणि न्यायमुर्ती रविंद्र व्ही. घुगे यांनी एका महिलेच्या रिट याचिकेवर निर्णय देतांना आनंद विवाह कायदा 1909 नुसार आणि आनंद विवाह नोंदणी नियम 2020 नुसार संबंधीतांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश जारी केले आहेत.
सतविंदरकौर मनमोहनसिंघ बिंद्रा आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका क्रमांक 15124/2023 दाखल केली. या रिट याचिकेतील मागणी प्रमाणे आनंद विवाह कायदा 1909 प्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त कार्यालय यांना विवाह प्रमाणपत्र देत नाहीत. सरकारपक्षाच्यावतीने 23 एप्रिल 2020 चे परिपत्रक उपलब्ध नाही. यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्तींनी वार्ड अधिकारी, विभागीय अधिकारी यांना परिपत्रक दि.23एप्रिल 2020 नुसार, आनंद विवाह कायदा 1909 संबंधीतांना विवाह प्रमाणपत्र देण्याचे आदेश जारी केले आहे.