नांदेड, (जिमाका) – महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी कलीना विमानतळ येथून खाजगी विमानाने दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. नागेश आष्टीकर यांची मुलगी चि.सौ.का. पुजा हिच्या विवाहप्रित्यर्थ सदिच्या भेट स्थळ नांदेड रोड हदगाव. दुपारी 2 वा. हदगाव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.