लोहा पोलीस अभिलेखात एका गुन्ह्यातला पत्रकार आरोपी दुसऱ्या गुन्ह्यात म्हणतो मी पत्रकारच नाही; वास्तव न्युज लाईव्हवर गुन्हा दाखल, धन्य तो योगेश्र्वर

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करण्याची पध्दत एकच महाभाग करत होते. आता त्यात दुसऱ्याची भर पडली आहे. हा प्रकार लोहा पोलीस ठाण्यात घडला असून एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्रकाराकडून मी पत्रकारच नाही असे लिहुन घेत वास्तव न्युज लाईव्हचे संपादक आणि रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वास्तव न्युज लाईव्ह सोबत रामप्रसाद खंडेलवाल यांचा काही अर्था-अर्थी काही संबंध नाही अशी पोलीस दप्तरी नोंद असतांना पुन्हा रामप्रसाद खंडेलवाल यांना टार्गेट करण्याचे पुण्य लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कमावले आहे. यासाठी खरे तर वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या तीन बातम्या आणि त्याही खऱ्या असतांना गुन्हा दाखल करून कमावलेले पुण्य चिंचोळकरांना नक्कीच कामी येईल.
सर्वप्रथम वास्तव न्युज लाईव्हने 25 सप्टेंबर 2023 रोजी “ओमकांत चिंचोळकरांना बोलतांना भान ठेवा नाहीतर स्टेशन डायरीत नोंद होईल’ अशी एक बातमी प्रसिध्द केली होती. ती बातमी आमदार शामसुंदर शिंदे यांच्याशी संबंधीत होती. त्याच्यासोबत झालेल्या वादाची नोंद ओमकांत चिंचोळकरांनी पोलीस स्टेशन डायरीत केली होती.त्यानंतर दुसरी बातमी वास्तव न्युज लाईव्हने 15 नोव्हेंबर 2023 रोजी लिहिली. त्याचा मथळा “आमदार साहेब विसरात काय पोलीस स्टेशन डायरीची नोंद ?’असा होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी आम्ही तिसरी बातमी लिहिली जी फिर्यादीनुसार पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले गोविंद वड व उत्तम महाबळे यांच्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात आम्ही “लोहा येथील पत्रकारांविरुध्द दाखल झालेल्या खंडणी गुन्ह्यातील फिर्यादी सांगतो मी त्या ढाब्याचा मालकच नाही, पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आली गदा’ असा त्याचा मथळा होता.
त्यावेळी गोविंद वड आणि उत्तम महाबळेला त्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळाली. त्या प्रकारणाचा फिर्यादी नारायण बळीराम ईबिवार यास कमरेला पकडून परत पोलीस ठाण्यात आणले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुध्दा उपलब्ध असतील.त्यानंतर गोविंद वड आणि उत्तम महाबळेला पोलीस कोठडी मिळाली आणि त्यांची जामीन झाल्यानंतर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला.त्याचा क्रमांक 311/2023 असून गुन्हा घडण्याची वेळ 24/11/2023 ते 24/11/2023 अशी लिहिलेली आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 500, 501, 34 आणि पोलीस अप्रतीची भावना चेतवणे अधिनियम 1922 जोडलेली आहेत. या फिर्यादीमध्ये उत्तम विश्र्वनाथ महाबळे म्हणतो की, मी आणि गोविंद वड हे सामाजिक कार्यकर्ते आहोत. दोघेही कोणत्याही वृत्तपत्राचे पत्रकार नाहीत. वास्तव न्युज लाईव्हकडे उत्तम महाबळे हा पत्रकार असल्याचे ओळखपत्र सुध्दा उपलब्ध आहे. त्या ओळखपत्रावर फिर्यादीमध्ये लिहिलेला स्वत:चा मोबाईल क्रमांक 9168931358 पत्रकाराच्या ओळपत्रावर सुध्दा नमुद आहे.
24 नोव्हेंबर रोजी उत्तम महाबळे आणि गोविंद वड पोलीस कोठडीत होते. तर त्यांना वास्तव न्युज लाईव्हची बातमी 24 तारखेलाच कशी कळली. हा ही एक प्रश्न गुन्हा क्रमांक 311 मध्ये उपस्थित होतो. गुन्हा क्रमांक 284 मध्ये लोहा पोलीसांच्या अभिलेखातच उत्तम महाबळे पत्रकार आहे आणि गुन्हा क्रमांक 311 मध्ये तो पत्रकार नाही. माझ्या पत्रकार बांधवांची बेअबु्र केली असे 311 च्या गुन्ह्यात लिहिले आहे. वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या बातमीमध्ये नारायण ईबितवारने सांगितलेली घटना खरी आहे याचा शोध कोण घेईल असे पण लिहिले आहे.
पत्रकारांची बदनामी केली असेल पत्रकारच तक्रारदार असायला हवा. पोलीसांबद्दल अप्रतीची भावना चेतावणे असा काही घटनाक्रम वास्तव न्युज लाईव्ह केला असेल तर त्यात पोलीसच तक्रारदार असावा. उत्तम महाबळे हा पत्रकार नाही असे जर 311 च्या गुन्ह्यात लिहिले आहे आणि त्याला 1922 चा अधिनियम सुध्दा माहित आहे मग तो किती विद्वान व्यक्ती असेल. हा सर्व प्रकार खोटे गुन्हे दाखल करण्याची एक श्रंखला आहे. वास्तव न्युज लाईव्हने जे काही लिहिले आहे ते सत्य माहितीवर आधारीत लिहिले आहे. परंतू पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी खोटे गुन्हे दाखल करून कमावलेले पुण्य त्यांना नक्कीच पुढील जीवनात उत्कृष्ट साथ देईल.असो शेवटी पोलीस करेल तेच होईल अशी म्हण हजारो वर्षापासून प्रचलित आहे.
संबंधीत बातम्या…

24 नोव्हेंबर 2023 ची बातमी…

https://vastavnewslive.com/2023/11/24/लोहा-येथील-पत्रकारांविरु/

 

25 सप्टेंबर 2023 ची बातमी…

https://vastavnewslive.com/2023/09/25/पोलीस-निरिक्षक-ओमकांत-चि/

 

15 नोव्हेंबर 2023 ची बातमी…

https://vastavnewslive.com/2023/11/15/आमदार-साहेब-विसरलात-काय-प/

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *