नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने वाजेगाव परिसरातील एका व्यक्तीकडून एक अग्नीशस्त्र(गावठी कट्टा) आणि दोन जीवंत काडतुस पकडले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले पथक वाजेगाव परिसरात पाठविले.त्या पथकाने पंचशिलनगर वाजेगाव येथील दशरथ हरी भद्रे (33) व्यवसााय ड्रायव्हर यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. या ऐवजाची किंमत 32 हजार रुपये आहे. या बाबत स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ. खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदरावजी मुंडे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, मोतीराम पवार, विलास कदम, मारोती मोरे, रणधिर राजबन्सी, गजानन बैनवाड आणि गंगाधर घुगे यांनी केली.
स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे पकडली