नांदेड,(प्रतिनिधी)-21 ते 27 डिसेंबर हा चार साहिबजादे यांचा बलिदान सप्ताह आहे. या दरम्यान महाविद्यालयांमध्ये या वीर बालकांसंबंधी कार्यक्रम घेवून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा अशी मागणी करणारे निवेदन विश्र्व हिंदु परिषद नांदेडच्यावतीने सिडको-हडको भागातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना देण्यात आले आहे.
21 ते 27 डिसेंबर हा आठवडा दशम पातशाह गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या परिवाराने दिलेल्या बलिदानासाठी प्रसिध्द आहे. यामध्ये माता गुजरीजी, साहिबजादे अजितसिंघजी(18), साहिबजादे झुजारसिंघजी (14), साहिबजादे जोरावरसिंघजी(9) आणि साहिबजादे फत्तेहसिंघजी (7) या सर्वांना मुगलांनी ईस्लाम धर्म स्विकारण्याकरीता जबरदस्ती केली तेंव्हा त्यांनी मरण पत्कारले परंतू धर्म बदलला नाही.
महाराष्ट्रातील पाठ्यक्रमात या विषयी कोणताही धड्डा शिकवला जात नाही. तरी पण या 21 ते 27 डिसेंबर दरम्यान विशेष कार्यक्रम घेवून आपल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या चार साहिबजादे यांच्या बलिदानाविषयी माहिती देवून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा असे निवेदनात लिहिले आहे. भारत सरकारने मागील वर्षी शासननिर्णयाद्वारे 27 डिसेंबर हा दिवस विर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. त्या संदर्भाने सुध्दा शाळा, महाविद्यालयात उपक्रम साजरे करण्यात यावेत. हे निवेदन देतांना विश्र्व हिंदु परिषद मठ मंदिर प्रमुख गजाननसिंह चंदेल, मोनुसिंग बावरी, तेजस माळवे, शुभम गोपिनवार, ओमकार नाईक आदी उपस्थित होते.
21 ते 27 डिसेंबर दरम्यान शाळा, महाविद्यालयात चार साहिबजादे यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा-विश्र्व हिंदु परिषदेचे निवेदन