
नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी 4-5 वर्षाचा मुलगा नांदेड-लातूर हायवेवर बेवारस फिरतांना विचारपुस केली. त्यानंतर त्याला आपल्या येथे ठेवले. त्याच्या आई-वडीलांचा शोध घेवून हा मुलगा सन्मानपुर्वक त्यांच्या कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, त्यांचे सहकारी पोलीस उपनिरिक्षक मुंडे, पोलीस अंमलदार कापडे आणि कदम हे गस्त करत असतांना लातूर नांदेड हायवेवर एक 4 ते 5 वर्षाचा मुलगा बेवारस अवस्थेत फिरत असल्याचा दिसला. त्याला बोलताही येत नव्हते आणि त्याला ऐकूही येत नव्हते. तेंव्हा पोलीसांनी त्या बालकाला पोलीस ठाण्यात आणले आणि वेगवेगळ्या सोशल मिडीया गु्रपवर त्या मुलाच्या पालकांचा शोध घेवून त्याची आई आणि त्याची आजी यांच्या ताब्यात देऊन पोलीसांमध्ये सुध्दा मानवच वसतो हे दाखवून दिले.