लोहा (प्रतिनिधी)-लोहा येथे दि.21 डिसेंबर रोजी सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या वंचीत बहुजन आघाडीच्या निर्धार मेळाव्यास सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा महासचिव शाम कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या हाके, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्या सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र हे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची बांधणी करण्यासाठी दि. 21 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते दि.21 डिसेबर रोजी सकाळी 11 वाजता नांदेड सिडको येथील माता रमाबाई आंबेडकर चौकातून सिडको,किवळा ,मानसपुरी मार्ग कंधार येथे जिप व मोटारसायकल रॅली काढून सर्व महामानवाला वंदन करून कंधारहुन बायपास मार्ग लोहा येथे मुख्य रस्त्याने येऊन व्यंकटेश गार्डन येथील मैदानात निर्धार मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत .यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते फारुख अहमद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच युवानेते सुजात बाळासाहेब आंबेडकर यांचे लोहयात भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमांचे आयोजन वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा दक्षीणच्या वतीने आयोजित करण्यात आला असून तेव्हा या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी केले आहे.
लोहा येथे सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या वंचीतच्या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे-नरंगले