13 लाख 54 हजार 900 रुपये किंमतीचे हरवलेले 102 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून हरवलेले 102 मोबाईल शोधून सायबर पोलीस ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे यांच्या हस्ते 56 जणांचे मोबाईल परत करण्यात आले आहेत. इतरांना पोलीसांनी आवाहन केले आहे की, नांदेड पोलीसांच्या फेसबुक पेज आणि ट्विटरवर आयएमईआय नंबर पाहून सायबर पोलीस ठाण्यातून आपले हरवलेले मोबाईल घेवून जावे.आयएमईआय क्रमांकाची यादी वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा वाचकांसाठी प्रसिध्द करत आहे.
नागरीकांचे मोबाईल हरवले जातात, ते कोठे तरी विसरतात आणि त्यानंतर त्यांना होणारा त्रास मोबाईल मिसिंग प्रकरणातून पोलीस दप्तरी नोंदवला जातो. अशा मोबाईलचा शोध घेण्याचे काम सायबर पोलीस ठाणे करते. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक जी.व्ही.दळवी, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, दावीद पिडगे, मोहन स्वामी, काशिनाथ कारखेडे, मोहम्मद आसिफ, विलास कदम, राजीव बोधगिरे, व्यंकट सांगळे यांनी परिश्रम करून 13 लाख 54 हजार 900 रुपयांचे 102 मोबाईल शोधले. त्यापैकी आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते 56 जणांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. उर्वरीत मोबाईलचे आयएमईआय क्रमांक नांदेड पोलीसांच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर प्रसिध्द करण्यात आले आहेत. यातील आयएमईआय नंबर ओळखून जनतेने आपले मोबाईल सायबर पोलीस ठाणे, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथून घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वास्तव न्युज लाईव्हने सुध्दा आपल्या बातमीसुध्दा आयएमईआय क्रमांकाची यादी वाचकांच्या सुविधेसाठी जोडली आहे.

MOBILE MISSING DEC 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *