नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात आज एका पोलिस अंमलदाराचा महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तसेच दुसरा पोलीस एका अपघातात जखमी झाला आहे.
कंधार तालुक्यातील बोरी या गावातून मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस आमदार तुकाराम साहेब आहे वय 50 हे आपल्या दुचाकी गाडीने कंधार लोहा मार्गे नांदेड कडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ येथे कारेगाव जवळ त्यांचा अपघात झाला आहे त्यांचा अपघात झाल्यानंतर जनतेने त्यांना लोहा येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मरण पावल्याची घोषणा केली आहे.
तसेच दुसरा एका अपघातात नांदेड नरसी रस्त्यावर काकांडीच्या पेट्रोल पंपाजवळ पोलीस अंमलदार सूर्यवंशी बक्कल नंबर
1882 हे आपल्या दुचाकी गाडीने येत असताना त्यांचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर सध्या विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.