नांदेड(प्रतिनिधी)-मालवण जि.सिंधदुर्ग या ठिकाणी 15 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत नांदेडच्या अजिंक्य रणजित नरवाडे या विद्यार्थ्याने समुद्रात 3 किलो मिटरपर्यंत यशस्वी जलतरण करून आपले साहस दाखवले.
नांदेड येथील लिटल स्कॉलर पब्लिक स्कुलमधील विद्यार्थी अजिंक्य रणजित नरवाडे यांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना महाराष्ट्र राज्य व सिंधदुर्ग जि.जलतरण संघटनेच्यावतीने मालवण येथे या समुद्र जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अजिंक्य नरवाडे याने समुद्रात तीन किलो मिटर सागरीअंतर पार करून आपले साहस दाखवले. सागर जलतरण स्पर्धेत सुध्दा नांदेडचे विद्यार्थी काही कमी नाहीत असे या स्पर्धेतून दिसले. नांदेडला समुद्राची कोणतीही पार्श्र्वभूमी नसतांना अजिंक्य नरवाडेने केलेले हे साहस कौतुकास्पद आहे. अजिंक्य नरवाडेचे प्रशिक्षक राजेश सोनकांबळे, मयुर केंद्रे आणि रविकुमार बकवाड हे आहेत. अजिंक्यचे वडील रणजित नरवाडे नांदेड जिल्हा पोलीस दलातील वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी सुध्दा आपल्या जीवनात खेळ या विषयाला भरपूर महत्व दिलेले आहे. नांदेडच्या शांताराम सगने जलतरणीकेत अजिंक्य नरवाडेने सराव केलेला आहे. या होतकरू मुलाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
नांदेडच्या अजिंक्य नरवाडे समुद्राचे तीन किलो मिटर अंतर पोहून पार केले