22 डिसेंबर रोजी उमरी व धर्माबाद येथे सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी मेळावा

नांदेड, (जिमाका) – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतर्गत 17 ते 30 डिसेंबर 2023 हा कालावधी गतीमानता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. या पंधरवड्या निमित्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 22 डिसेंबर 2023 रोजी उमरी व धर्माबाद येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सकाळी 10 वा. पंचायत समिती सभागृह, उमरी व पंचायत समिती सभागृह, धर्माबाद येथे आयोजित केला आहे. धर्माबाद व उमरी तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्व समावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट- 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेत सन 2023-2024 मध्ये नांदेड जिल्हयास एकूण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे.

 

या मेळाव्यात कर्ज मंजूरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे/मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावीत. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायनुंषिक इतर परवाने इ. कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी या योजनेच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *