नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या खाजगी चारचाकी गाड्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्याची कॅप (टोपी)ठेवून मिरवण्याचा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या गाडीत तशी कॅप आहे ती गाडी पोलीसाचीच आहे की, कोणी खाजगी माणुस त्याचा दुरूपयोग करत आहे. याचा शोध होण्याची नक्कीच गरज आहे.
आजच्या परिस्थितीत चार चाकी वाहन घेणे हे कोणासाठीही शक्य झाले आहे. कोणीही व्यक्ती चार चाकी वाहन खरेदी करतो आणि मिरवतो. तो प्रत्येकाचा आप-आपला अधिकार आहे. मोटार वाहन कायदा आणि नियम आहेत. त्यामुळे गाडीवर नंबर आरटीओने दिलेले पध्दतीतच लिहिले आवश्यक आहे. कारण आता सध्या तर आरटीओ नंबर प्लेट तयार करून देतात. त्या खाजगी गाडीमध्ये पोलीसाची कॅप ठेवणे, पोलीस असे लिहिले बोर्ड लावणे या एक प्रकाराने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नांदेडचच बोलायच झाल तर दिवसातून अशा 10 ते 20 गाड्या दिसतात. आपण बाहेरगावी गेलो तर रस्त्यात आपल्याला 5-50 गाड्या नजरेला पडतात.
या गाड्या खरेच पोलीसांच्या आहेत काय? किंवा कोणी इतर माणुस तशी कॅप किंवा पोलीस लिहिलेला बोर्ड लावून त्या गाड्यांचा दुरूपयोग करत आहे काय? हे पाहण्याची अत्यंत गरज आहे. कारण त्या गाड्यांमध्ये कशाची वाहतूक होत आहे, त्या गाडीची डिकी कोणी तपासते काय?, समोर दोनच माणसे असतील तर मागची सिट तपासली जाते काय असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत. खाजगी गाडी पोलीस विभागातील अधिकारी किंवा अंमलदाराचीही असेल तरी त्यात अशी पोलीस कॅप (टोपी) किंवा पोलीस लिहिलेला बोर्ड लावता येतो काय? पण म्हणतात ना पोलीस खाते करील तेच होईल असेच चालतच आलेले आहे, चालत आहे आणि चालत राहणार आहे. आम्हाला प्राप्त झालेल्या छायाचित्रातील गाडी पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेली आहे. ही गाडी नांदेडच्या व्हीआयपी रस्त्यावर उभी असतांना आम्ही या गाडीचा फोटो काढलेला आहे.
खाजगी गाडीमध्ये पोलीस कॅप किंवा पोलीस लिहिलेला बोर्ड लावता येतो काय?