जनावर चोरी करणाऱ्या सहा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-भिवंडी येथील काही जनावर चोर नांदेडच्या काही जनावर चोरांसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख 40 हजार रुपये आणि जनावर चोरीसाठी वापरली जाणारी चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर मागे एकदा बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरींग करण्यात आली होती.
आज 21 डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर वेगवेगळ्या ठिकाणचे जनावर चोरी करणारी मंडळी एकत्रित मलंगबाबा ईमारतीजवळ थांबली आहे. त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला तेथे पाठविले. तेथे त्यांनी रिझवान खान ईतिया खान (33) रा.मापोली ता.भिंवडी जि.ठाणे, मोहम्मद फेरोज उर्फ समीर मोहम्मद सलीम (30)रा.टायरबोर्ड बिलालनगर,नांदेड, समीर उर्फ बच्ची कुरेशी अनिल कुरेशी (22)रा.कसाईवाडा, जिनामपुर जि.ठाणे, मोहम्मद शोयब, मोहम्मद शफील (21)रा.मंडई इतवारा, नांदेड, मोहम्मद इक्राम उर्फ वाजीद ईस्माईल (26) रा.खुदबेनगर चौक नांदेड, चॉंद उर्फ चंदू जमाल शेख (36) रा.बिलालनगर टायरबोर्ड नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी जनावर चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम 2 लाख 40 हजार रुपये आणि जनावरे चोऱ्यांसाठी वापरली जाणारी चार चाकी गाडी, मोबाईल, असा 4 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने चोरलेली जनावरे सय्यद सोहेल सय्यद फारुख (38) रा.बळेगाव ता.उमरी आणि शेख खाजीद उर्फ सदो शेख यासीन रा.कुराबगल्ली देगलूर नाका नांदेड यास विक्री केल्याचिे सांगितले. रिजवान खान ईतिया खान हा जनावर चोर एका टोळीसोबत असतांना बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यावर रामतिर्थूचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांनी गोळीबार करून त्यांना पकडले होते. सध्या या सहा आरेापींना अर्धापूर पोलीस ठाण्यातील जनावर चोरीचा गुन्हा क्रमांक 446/2023 च्या तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जनावर चोरी करणाऱ्या टोळीला पकडणाऱ्या पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निक्षिरक्ष उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक गोविंदरावजी मुंडे,दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, संजय केंद्रे, विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, संग्राम केंद्रे, गजानन बैनवाड, रणधिर राजबन्सी, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, धम्मा जाधव, हनुमानसिंह ठाकूर, शेख कलीम आदींचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *