लोहा(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कंधार-लोहा विधानसभा मतदार संघात एका सभेत बोलतांना सुजात आंबेडकर म्हणाले जातीयवाद तोडल्याशिवाय भारत जोडता येणार नाही. या अगोदर सिडको भागातील रमाई चौक ते लोहा पर्यंत सुजात आंबेडकरांनी रॅलीसह कंधार मार्गाने लोहा शहरात पोहचले. या जवळपास 70 किलो मिटर प्रवासात जागो-जागी त्यांचा सन्मान करण्यात आला.
लोहा-कंधार मतदार संघ वंचित बहुजन आघाडीच्या फिक्स डिपॉझिटमध्ये लिहिलेला आहे. हे विरोधकांना सांगून टाका कारण एवढ्या थंडीत, एवढा उशीर झालेला असतांना सुध्दा आपण येथे उपस्थित आहात हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
आजची आपली ताकत पुढे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तसुभर सुध्दा कमी होवू देऊ नका. कारण या ताकतीनेच आपण शिवा नरंगले यांना लोहा-कंधार विधानसभा या मतदार संघातून आमदार बनवा. त्यानंतर तुमच्या प्रश्नासाठी आपण लढणार आहोत.

भारतीय जनता पार्टीवाल्यांनी टी.व्ही.वर चालणाऱ्या हास्य जत्रा आणि कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाप्रमाणे काम सुरू केले आहे. लोकसभेच्या सभापतींच्या मागे आजपर्यंत दोन फोटो होते. त्यात एक महात्मा गांधी यांचा आणि एक जवाहरलाल नेहरु यांचा. भारतीय जनता पार्टीवाल्यांनी त्यात नेहरुजींचा फोटो काढून त्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला. याचे कारण असे आहे की, कोणीही बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध खुल्यारितीने करूच शकत नाही. मनात त्यांच्या असू शकते पण ते दाखवू शकत नाहीत. त्यावेळेस कॉंग्रेसवाले म्हणतात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला त्यास आमचा विरोध नाही. परंतू जवाहरलाल नेहरु यांचाही फोटो राहु द्या. ही सर्व नौटंकी आहे. भाजपवाल्यांमध्ये खराच दम असेल तर राजस्थान उच्च न्यायालयात लाावलेला मनुचा पुतळा उखडवून दाखवा असे सुजात आंबेडकर म्हणाले.
मागे काही दिवसांपुर्वी चार युवक संसद परिसरात घुसले त्यांनी शांततेचे नारे लावले, इन्कलाबचे नारे लावले. त्यावेळेस संसदेच्या सुरक्षा रक्षकांअगोदर भाजपच्या काही खासदारांनी पकडून त्यांना मारायला सुरूवात केली. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होता. पहिला प्रश्न असा आहे की, संसदेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती. दुसरा प्रश्न असा आहे की, संसदेत घुसलेल्या युवकांना मारायचेच होते म्हणून अनेक गुन्हेगारी अभिलेख असलेल्या लोकांनाच भारतीय जनता पार्टीने खासदारकीचे तिकिट दिलेले आहे. संसदेत शिरलेल्या युवकांनी गॅसचा बॉम्ब फोडून आपल्या मागण्या पुर्ण करण्याचे नारे दिले. त्या युवकांचे काय होईल ते ठिक. परंतू ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारंानी संसदेत येण्यासाठी पासेस दिल्या. त्यांच्यावर काय कारवाई झाली. त्यावर सुध्दा त्या खासदारांना निलंबित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे जनतेने निवडुण दिलेल्या लोकांना निलंबित करत असेल तर याचा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही तुम्ही मोडत काढत आहात म्हणूनच आता आम्हाला निवडणुकीत उभे राहायचे आहे आणि निवडुण यायच आहे. भाजप भारताच संविधान आणि भारतातील लोकशाही नष्ट करायला निघालेली आहे. जो पर्यंत वंचित तुमच्यासमोर उभा आहे तोपर्यंत संविधान आणि लोकशाही याच काहीही वाकड करण्याची ताकत भाजपमध्ये नाही. युवकांनी त्या ठिकाणी फोडलेला गॅस बॉम्ब नंतर पत्रकारांच्या हातात होता. ते संसदेबाहेर कॅच-कॅच खेळत होते. नरेंद्र मोेदींना हा विचार करायला पाहिजे तो बॉम्ब तपासणीसाठी प्रशासनाच्या हातात यायला हवा होता. तर तो पत्रकारांच्या हातात कसा गेला.जर तो बॉम्ब अवशेष पत्रकारांच्या हातात असेल तर त्या वस्तूवर पत्रकारांची बोटांचे ठसे उमटले असेल तर तेंव्हा दिल्ली पोलीसांनी त्यांचीही चौकशी करायला हवी.
एकीकडे सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करत आहे. त्यात बंद झालेल्या 9-10 मिळून एक विभागीय शाळा सुरू करण्याचा घाट आहे.ती शाळा 9 महिन्याच्या कंत्राटी पध्दतीवर चालविण्यास देण्यात येणार आहे. मग एक कंत्राट संपल्यावर मुलांनी कुठे शिकायचे. विविध संस्थांना देण्यात येणारा निधी बंद करण्यात आला आहे. तसेच हे कंत्राट कोणाला मिळतील तर ते खासदार आणि आमदारांच्या मुलांना. त्यांच्याकडून किती अपेक्षा आम्ही करायची आणि अशा पध्दतीने आमच्या शिक्षणावर गदा आणून एक आधुनिक प्रकारचा जातीयवाद आणला जात आहे असे सुजात आंबेडकर सांगत होते.त्यांना आपल्या डोक्यावर मनुवाद रंगवायचा आहे. शिक्षण संस्था, साखर संस्था असे अनेक उद्योग प्रस्तापितांच्या हातात आहेत आणि ते सर्व आम्हाला हिसकावून घ्यायचे आहेत असे सुजात आंबेडकर सांगत होते. शिक्षणासाठी ज्याप्रमाणे आम्ही लढतो आहोत त्याप्रमाणे गरीब मराठा समाजातील मुलांची सुध्दा तशीच परिस्थिती आहे.मराठा समाजाने शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी मागील चार महिन्यापासून सुरू केलेले अत्यंत मोठ्या स्वरुपाचे आहे. मला मराठा समाजाला सांगायचे आहे की, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की, विद्यावाचस्पती (पी.एचडी) करून हे लोक अर्थात मराठा समाजातील मुले काय दिवे लावणार आहेत.अजितदादा पवारचे आंदोलनाच्यावेळी असे म्हणणे म्हणजे ते विधान तुमच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे आहे आणि यासाठी सर्व मराठा समाज बांधवांनी याला अत्यंत गंभीरतेने घेण्याची गरज आहे. मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतांना भाजपने नवीन खलबत केले आहे. दोन समाजांमध्ये भांडणे लावून आपली सत्ता काबीज ठेवण्याचा प्रयत्न तो आहे. ओबीसीला आरक्षण कसे मिळाले याचा ईतिहास तपासण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. तो तपासला तर त्यातून सत्यता समोर येईल. पण यावर काही बहुजन नेते म्हणत होते की, आता ईतिहासात जाऊन काय करणार. कारण या प्रसंगावर सुजात आंबेडकरांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे वाक्य उल्लेखीत केले. Those who can never understand histroy hi can not right अर्थात जो माणुस आजपर्यंत ईतिहास समजू शकला नाही तो ईतिहास लिहुन सुध्दा शकत नाही. यावेळी मंडळ आयोगाच्या सुचना लागू कराव्यात म्हणून फक्त एकटे बाळासाहेब आंबेडकर लढले होते. पण त्यांना विरोध भारतीय जनता पार्टीने केला होता. आम्हाला आमचे आरक्षण आमच्या जातीवर मिळाले आहे. ते धर्मावर नव्हे म्हणून त्यावेळी लालकृष्ण आडवणी यांनी तुम्ही बहुजन नाहीत तर हिंदु आहात असा प्रचार केला होता. पण आम्ही बहुजनच आहोत आणि जोपर्यंत बहुजन हा विचार घेवून या मैदानावर उतरणार नाहीत तो पर्यंत आपल्यात भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचे विष पेरत राहिल.
जातीयवाद तोडल्याशिवाय भारत जोडता येणार नाही असे सांगतांना सुजात आंबेडकरांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर टिका केली. भारत जोडायचा असेल तर आंबेडकर स्विकारावा लागतो. आपल्याला जातीयवाद तोडायचा असेल तर महाराष्ट्रात एकच व्यक्ती आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच हे करू शकते असे सुजात आंबेडकर म्हणाले.म्हणून मी कॉंग्रेसवाल्यांना सांगतो अजूनही संधी आहे एकत्र या.आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवलेत, मल्लीकार्जुन खरगेंना एक पत्र लिहिल, बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना पत्र लिहिल. कॉंगे्रस पक्षाची दोन वेळेसची सत्ता गेल्यानंतर त्यांचे काय हाल आहेत हे पुर्ण भारताने पाहिले आहे. आम्हाला काही सत्तेत जायची गरज नाही. कारण आम्ही अगोदरच रस्त्यावर आहोत. गरज तुम्हाला आहे, तुमच्या नातेवाईकांना आहे, तुमच्या शिक्षण संस्था जपायचे आहेत, तुमचे कारखाने जपायचे आहेत यासाठी तुम्ही सोबत या. आम्ही वंचितांचा लढा लढणारच आहोत. आज सत्तेत गेलो नाही तर पुढच्या सत्तेत जाऊ, पुढच्यावेळी सत्तेत जाऊ आणि तेंव्हाही जाता आले नाही तर दार तोडून आत जाऊ.उद्या निवडणुकीमध्ये 15-20 तुमचे दिग्गज आमदार घरी बसले तरी आमच्याकडे रडत येऊ नका असे सुजात आंबेडकर सांगत होते. आज आम्ही तुम्हाला संधी देत आहोत नंतर रडतांना आम्ही बिलकुल ऐकून घेणार नाही. कॉंगे्रस पक्षाने दुटप्पी भुमिका थांबवून खरच तुम्हाला भारतीय जनता पार्टीच राजकारण संपवायचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गांना धरुनच आपल्याला चालावे लागेल.