बाली कांबळे यांना प्रा.विठ्ठल कागणे यांच्या हस्ते समाजभुषण पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त नांदेड येथील युवा पॅंथरचे जिल्हाध्यक्ष बाली कांबळे यांना समाज भुषण पुरस्कार देतांना व्याख्याते प्रा.विठ्ठल कागणे यांनी युवकांशिवाय समाजाची उन्नती असख्य असल्याचे सांगितले.
दि.16 डिसेंबर रोजी एकता बहुउद्देशिय सेवाभावी संस्था उमरीच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले. त्यात नांदेड येथील नावघाट येथे राहणारे युवा पॅंथरचे जिल्हाध्यक्ष बाली नारायणराव कांबळे यांनी समाजातील शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतीक कार्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गौरवान्वित करण्यात आले. मोंढा मैदान उमरी येथे हा समारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटक प्रा.रविंद्र पाटील चव्हाण हे होते. कार्यक्रमअध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरूजी हे होते. विशेष उपस्थिती कैलास गोरठेकर यांची होती. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा.विठ्ठल कागणे हे होते. कार्यक्रमाचे आयोजक एकता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सोनु वाघमारे, संदीप गोवंदे, राजेश गवई हे होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संजीव विठ्ठलराव सवई हे होते.
या कार्यक्रमात पुढे बोलतांना प्रा.विठ्ठल कागणे म्हणाले युवकांच्या पुढकाराशिवाय कधीच प्रगतीचा मार्ग पुर्ण होवू शकत नाही. तेंव्हा युवकांनी मला काय मिळते आहे यापेक्षा मी समाजाला काय देत आहे याचा विचार करावा. जेणे करून त्यांचा समाजिक सहभाग प्रत्यक्षात दिसेल. या कार्यक्रमात बहुसंख्य लोक उपस्थित होते. सर्वांनी बाली कांबळे यांना शुभकामना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *