नांदेड(प्रतिनिधी)-वडीलांनी रागावल्यानंतर घरसोडून गेलेली एक अल्पवयीन बालिका अत्यंत त्वरीत हालचाल करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीसांनी तिला एका दिवसात शोधले आणि परत आई-वडीलांच्या स्वाधीन केले.
दि.22 डिसेंबर रोजी शहरातील एका वडीलाने आपल्या 16 वर्षीय मुलीला रागावले. ती मुलगी आपला मोबाईल घरीच ठेवून शेजाऱ्याकडे जाऊन येते म्हणून बाहेर पडली. बऱ्याच वेळानंतर मुलीचा शोध घेतला तेंव्हा ती मुलगी शेजाऱ्याकडे गेलीच नाही. तेंव्हा घाबरलेला वडील पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव यांना भेटले. त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि मुलीला शोधून देण्याची विनंती केली.
पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून शहरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज चेक केले, तिच्या मित्र, मैत्रीणीकडे माहिती घेतली. परंतू काहीच माहिती सापडली नाही. बाहेर गेेलेली मुलगी आपला फोन घरीच सोडून गेली होती. त्यामुळे जास्त अडचण येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरून निघून गेलेली बालिका एका मैत्रिणीला भेटल्याची माहिती मिळाली. ती मुलगी एका ठिकाणी एकटीच बसलेली होती. तिच्या वडीलांसोबत घेवून त्या मुलीला पोलीस अधिक्षक कार्यालयात आणल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि प्रियंका आघाव यांनी स्वत: त्या मुलीचे आणि तिच्या आई-वडीलांचे समुपदेश करून सुखरूप पध्दतीने कुटूंबाच्या स्वाधीन केले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, सायलू बिरमवार, गणेश जाधव, दिपक ओढणे, यशोदा केंद्रे यांनी सायबर सेलच्या मदतीने केलेल्या यशस्वी कार्यवाहीसाठी सर्वांचे कौतुक केले आहे.
घरातून निघून गेलेली 16 वर्षीय बालिका अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील पोलीसांनी शोधली