नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक अग्नीशस्त्र (गावठी कट्टा) आणि दोन जीवंत काडतूस असा 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे.
दि.23 डिसेंबर रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार माळटेकडी उड्डाणपुलाखाली काही युवक शस्त्र बाळगुण आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तेथे गेल्यानंतर त्यांनी निकेश उर्फ बॉबी चंद्रमणी हटकर (26) आणि कृष्णा राजेश स्वामी (18) दोघे रा.गंगाचाळ नांदेड आणि तिसरा संदीप अंकुश पवार (20) रा.गोविंदनगर नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक अग्नीशस्त्र(गावठी कट्टा) दोन जिवंत काडतूस व एक मोबाईल असा एकूण 69 हजारांचा मुद्देमाल पकडण्यात र्ींआला. वृत्तलिहिपर्यंत या तिघांविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, विलास कदम, गणेश धुमाळ, गजानन बैनवाड, रणधिर राजबन्सी, मोतीराम पवार हेमवती भोयर, शेख कलीम, सायबर सेलचे दिपक ओढणे, राजू सिटीकर यांचे कौतुक केले आहे.