नांदेड, (प्रतिनिधी)-नियंत्रण कक्षात नियुक्ती असतांना पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ठाणूसिंग चव्हाण आजही स्थानिक गुन्हाशाखेत कार्यरत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या हजेरी पटावर त्यांचे नाव सुद्धा नसताना त्यांची हजेरी कोठे होत आहे हा सर्वात मोठा विषय समोर आला आहे.
नांदेड जिल्ह्यात ऑपरेशन करण्यामध्ये माहीर असलेले एक डॉ. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण कार्यरत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात आहे. पण ते आजही स्थानिक गुन्हा शाखेत काम करतात नियंत्रण कक्ष अनेकदा विचारणा करते की, तुम्ही कुठे आहेत.इकडे तर स्थानिक गुन्हा शाखेच्या हजेरीपटात सुद्धा त्यांचे नाव नाही. काही पंचरवाल्यांना मदत करत आणि त्यांना पुढे आणून आपला कारभार चालवण्यात ते उत्कृष्ट कार्य करतात.ज्याप्रमाणे डॉक्टर उत्कृष्ट शस्त्रक्रिया करण्यात आपले नाव कमावतो. त्याचप्रमाणे हे डॉक्टर परमेश्वर चव्हाण सुद्धा पोलीस दलातील शस्त्रक्रिया अत्यंत उत्कृष्टपणे करतात. पण प्रश्न असा आहे की त्यांचे नाव स्थानिक गुन्हा शाखेच्या हजेरीपटात नाही, तर मग ते त्या ठिकाणी काम कसे करतात. त्यांची पगार कोणत्या विभागातून निघते? त्यांचे पगार बिल कोण पाठवते? नियंत्रण कक्षाच्या हजेरीपटात सुद्धा हजेरी नाही आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तर हजेरीपटातच त्यांचे नाव नाही नांदेड जिल्ह्याच्या पोलिस अभिलेखात असे सुद्धा सुरू आहे.योगेश्वर सर्व समजत असतात, त्याच्यावर का कार्यवाही करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे की, योगेश्वरापासून सर्व लपवून चालले आहे ते किती दिवस लपेल? जरासंघाने सुद्धा श्रीकृष्णाला शंभर शिव्या देईपर्यंत ते हसत राहिले परंतु जरा संघाने 101 क्रमांकाची शिवी देण्या अगोदर त्याचे मुंडके धडा वेगळे करणारा श्रीकृष्ण आजही त्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या कुटुंबासाठी हैदराबाद दवाखान्यात चकरा मारून नेहमीच परेशान असणाऱ्या काही पोलिसांची साथ सुद्धा डॉक्टर चव्हाणच्या आणि त्या पंचर वाल्याच्या पारड्यात पडते आहे.