नांदेड,(प्रतिनिधी)- भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकारी आणि अनेक पोलिस अंमलदार, सोबत मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी हजर असताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले.