नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 आणि 4 मध्ये असलेल्या एका रेल्वे रुळावर रिकामी प्रवासी गाडी उभी असताना तिच्या डब्यात आग लागून काही नुकसान झाले आहे.सुदैवाने या प्रकरणात काही जीवित हानी झाली नाही.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी फलाट क्रमांक 3 आणि फलाट क्रमांक 4 च्या मध्ये असणाऱ्या एका रेल्वे रुळावर रिकामी प्रवासी गाडी उभी होती.त्यातील एका डब्यात आग लागली असताना अग्निशमन विभाग, रेल्वे अधिकारी, रेल्वे कर्मचारी आरपीएफ आणि पोलीस यांनी मिळून ती आग आटोक्यात आणली .त्या गाडीतील काही सीट जळाल्याचे दिसत आहे.ही आग कशी लागली,कारण काय? याबद्दल आता एक रेल्वे कमिटी याची चौकशी करेल असे सांगण्यात आले.