नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आज वीर बालदिवस साजरा केला.
26 डिसेंबर हा दिवस विर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी आज वीर बालक जोरावरसिंघजी व बाबा फत्तेहसिंघजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मंत्रालयीन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि विनोद भंडारे यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात विर बाल दिवस साजरा