नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी प्रतोद, महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड शहर कॉंग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष हंसराज सुभाष काटकांबळे यांच्यावतीने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याच प्रमाणे या वर्षी माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात गरजु लोकांना मायेची उब देण्यासाठी ब्लँकेटस् वाटप करण्यात आले.
यावेळी अर्धापूर नगरपंचायतीचे नगरसेवक सोनाजी सरोदे, युवक कॉंग्रेसचे उत्तर अध्यक्ष विक्की राऊतखेडकर, शहर कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस सुभाष काटकांबळे, शहर सचिव नागेश सुलगेकर, उत्तर युवक कॉंग्रेसचे महासचिव शुभम वाघमारे, नितेश दुर्गम, विजय गोडबोले, यशवंत चिखलीकर, रोहित खंदारे, साई देशराज, वांशराज बेंद्रिकर, विनय करमकुंडा, सय्यद सोहेल, शेख जबार, कौस्तुभ देशमुख, आदित्य जोंधळे,सम्यक सरोदे,ऋषी मल्हारी आदी उपस्थित होते.