नांदेड(प्रतिनिधी)-कळगाव ता.उमरी येथे एका शेताच्या आखाड्यात जुगार खेळणाऱ्या 21 जुगाऱ्यांना पकडून पोलीसांनी 10 लाख 72 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात रोख रक्कम 62 हजार 400 रुपये आहे.
पोलीस अंमलदार रमन फकीरा गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबर मध्यरात्री मौजे कळगाव ता.उमरी येथील बालाजी डांगे यांच्या शेताच्या आखाड्यावर जुगार खेळणाऱ्या 21 जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 208 पत्ते रोख रक्कम 62 हजार 400 रुपये आणि 9 दुचाकी गाड्या असा एकूण 10 लाख 72 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
जुगार खेळणाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. बालाजी भिमराव डांगे (29) रा.कळगाव, श्रीनिवास मारोती सावंत (27), नागर मारोती गोेमासे(40) दोघे रा.गोरठा, गणपती वैजनाथ गवळे (38) रा.वाडी रोड, विठ्ठल लक्ष्मण नाईकवाडे (40) रा.जामगाव, अंकुश बालाजी कावळे (28), गोविंद नारायण शिंदे (36), मोहन मनोहर बास्टे (23), माधव संपतराव पोवळे सर्व रा.कार्ला, साजिद सलीम शेख (20), सुमेध भिमराव डोंगरेे(25), अनिल विजय पगलवाड(24), नंदकिशोर उत्तमराव माचेवार(31) सर्व रा.ढोल उमरी, संजय धनू जाधव (33) रा.कळगाव तांडा, शिवाजी लक्ष्मण चंदापुरे(36) रा.निमटेक, बालाजी शंकर राठोड(32) आणि उल्हास बापूराव जाधव (32) रा.दुर्गा तांडा, नागेश धोंडीबा येरसावडे(31), दत्तराम माधव चंचलवाड(20), आनंदा माणिकराव भोसले (20), अमोल सुधाकर जाधव (20) असे आहेत. पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 365/2023 दाखल केला असून पोलीस अंमलदार रमण गेडाम अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरात सुरू असलेल्या जुगाराचे काय?
उमरी पोलीसांनी मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 21 जुगाऱ्यांवर कार्यवाही केली ही बाब प्रशंसनिय आहे. नांदेड शहरातील विधानसभे अनुसार दक्षीण नांदेड आणि उत्तर नांदेड या दोन्ही विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी मोठे-मोठे जुगार अड्डे सुरूच आहेत. त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही. स्थानिक गुन्हे शाखा एक गावठी पिस्टल पकडते आणि 20 लोकांसह त्याचा फोटो प्रसारीत करण्यासाठी पाठवते. पण कोणताही जुगार स्थानिक गुन्हा शाखेने सध्या तरी पकडलेला दिसत नाही किंवा तेथे छापा टाकलेले दिसत नाही.वरकरणी असे दाखवले जाते की सर्व काही 2 नंबरचे धंदे बंद करण्यात आलेले आहेत. परंतू ते सर्व धंदे सुरूच आहेत. त्याचे काय होणार, कधी होणार, कोण करणार या प्रश्नांची काहीच उत्तरे सापडत नाहीत.
उमरी पोलीसांनी 21 जुगारी पकडून 10 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला; शहरातील जुगारावर कोण कार्यवाही करणार ?