नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस दप्तरी माळाकोळी येथे एक घरफोडी, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन चोऱ्या अशा चार प्रकारांमध्ये एकूण 6 लाख 97 हजार 130 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
कदमाची वाडी ता.लोहा येथील मेंढपाळ भगवान गोविंद लोमटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळात ते बाहेरगावी गेले असतांना त्यांच्या घरावरचे टिनपत्रे काढून कोणी तरी चोरट्याने आत प्रवेश केला आणि लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 193/2023 दाखल केला असून माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत.
संतोष सुदाम कोलंबिकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान ते आणि त्यांची आई नांदेडला आईच्या डोळ्यावर उपचार करून परत कोलंबीकडे जाण्यासाठी चंदासिंग कॉर्नर येथील बस थांब्यावर थांबवले होते. बसमध्ये प्रवेश करतांना आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र 60 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 899/2023 दाखल केला असून पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करणार आहेत.
विमलबाई लक्ष्मणराव कांबळे रा.कंधार या 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास बस स्थानक कंधार येथे आल्या होत्या. त्यांचा नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना गावाला जायचे होते. परंतू बसमध्ये प्रवेश करत असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र 50 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात व्यक्तीने चोरले आहे. कंधार पोलीसांनी गुन्हा क्रमांक 410/2023 दाखल केला असून पोलीस अंमलदार सानप अधिक तपास करीत आहेत.
जिवन माधवराव सूर्यवंशी हे टाटा पॉवरचे सूपरवायझर आहेत. दि.20 डिसेंबरच्या सायंकाळी 6 ते 25 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजेदरम्यान टाटा पॉवर प्लॅंट हिमायतनगर येथील 10090 मिटर वनकोर केबल किंमत 5 लाख 75 हजार 130 रुपये ही कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलीस ठाणे हिमायतनगर येथे हा गुन्हा क्रमांक 264/2023 महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
चार विविध चोऱ्यांमध्ये 7 लाखांचा ऐवज लंपास