नांदेड(प्रतिनिधी)-आज डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आज 27 डिसेंबर डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि मारोती कांबळे यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुखांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन