नांदेड (जिमाका) – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट ही महिना सुरू होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपाईमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घेऊन शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
कंधार तालुक्यासाठी 3 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 3 मे, 4 जून असे राहील तर धर्माबाद 5 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 5 एप्रिल, 7 मे, 7 जून 2024.