हत्तीरोग विभागातील संजय भोसले दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा आरोग्य विभागातील हत्तीरोग नियंत्रण पथक कार्यालय नांदेड येथील प्रयोगशाऴा वैज्ञानिक अधिकारी या पदावर कार्यरत असलेले संजय भोसले व त्यांच्या धर्मपत्नी गृहणी सौ.सुनिता भोसले या दांपत्यानी नवीव वर्षाेचे स्वागत सुंदर कल्पक भावनेतून मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केेेलेली असून त्यांचे सर्व सहकारी,मित्र परिवारांनी ही या संकल्पनेचे जोरदार स्वागत करुन कौतूक केले असून भोसले दांपत्याचे हा निर्णय सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले आहे. संजय भोसले यांनी मरणोत्तर देहदानाचे महत्व सांगून हे दान सर्व श्रेष्ठ दान असल्याचे सांगीतले. प्रजाकसत्ताक दिनी देहदान करणा-या या दांपत्याचे पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्याचे ठरविण्यांत आलेले आहे. जेणे करुन सर्व कर्मचा-यांना व इतर स्तरातून सर्वाना यातून प्रेरणा मिळेल व मरणोत्तर देह दान करण्यासाठी इच्छा व्यक्त करत पुढे येतील.

या दाम्पत्यांच्या मरणोत्तर देहदान संकल्पा बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ आकाश देशमुख, कार्यालयीन अधिक्षक कैलास सावळे, सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण, माधव पाटील शिंदे, चेअरमन सुभाष कल्याणकर, पप्पू देसाई नाईक, गणेश सातपुते, मोहन पेंढारे, माणिक गिते, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, माधव कोल्हे, चंद्रभान धोंडगे, सचिन दळवी, पांडुरंग बोरकर, बालाजी केंद्रे, शंकर दंतुलवार, कैलास कल्याणकर, रघुनाथ हुंबे, श्याम सावंत, किरण कुलकर्णी, गजानन अल्लापुरे,भारत हाम्पले, जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *