भोकर-उमरी रस्त्यावर मोघाईजवळ अंतिमक्रियेला जाणाऱ्या दोन युवकांवर काळानेच घातला विळखा

भोकर(प्रतिनिधी)-आपल्या एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन जणांना एका हायवा गाडीने धडक दिल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू घडला आहे.
हडोळी येथील रहिवासी संजय बाबाराव पाटील (42) व शामराव पुंडलिक पाटील (52) हे दोन जण हडोळी येथून उमरीकडे जात असतांना हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 व्ही.ई.2261 या ट्रकने त्यांना एवढ्या जोरात धडक दिली की, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. घटना पाहणाऱ्या अनेक साक्षीदारांनी घटना होताच तिकडे पळाले परंतू मयताना त्यांची मदत कामी आली नाही. हायवा ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतू गावकऱ्यांनी तो अडवून ठ ेवला. भोकर पोलीसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *