नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 85 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भोकर शहरात एका मोटार सायकलमधील 22 हजार रुपये किंमतीची थंबमशीन चोरण्यात आली आहे.
नांदेड शहरातील सुर्योदयनगर, बी ऍन्ड सी कॉलनी येथे राहणारे वसीम खान जबी खान पठाण यांनी दिलेल्यातक्रारीनुसार 27 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता ते आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेले होते.28 डिसेंबरच्या पहाटे 6 वाता त्यांना घरफोडल्याची माहिती मिळाली. चोरट्यांनी या घरात कोणी नाही याचा फायदा घेवून घराचा कुलूप कडीकोंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे, क्रेडीट कार्ड, ब्युटी पार्लर साहित्य, स्पोर्टस् रायफल, शुटींग जॅकेट आणि रोख रक्कम 35 हजार रुपये असा एकूण 4 लाख 85 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 457, 380 नुसार विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 429/2023 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे.
पोमनाळा ता.भोकर येथील दत्तात्रय माधवराव सोळंके हे 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास आंबेडकर चौक भोकर येथे आपली मोटारसायकल उभी करून फराळ करण्यासाठी गेले असतांना त्यांच्या दुचाकीत ठेवलेली 22 हजार रुपयांची थंबमशीन व इतर कागदपत्रे कोणी तरी चोरट्यांनी चोरली आहेत. भोकर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा क्रमांक 429/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कानगुले यांच्याकडे देण्यात आला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडून 4 लाख 86 हजारांचा ऐवज चोरला