सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिंगाडे, गायकवाड आणि सोनटक्केसह सहा जण पोलीस तक्रार प्राधिकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्त

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात नांदेड येथे मागे कार्यरत असलेले आणि आज सेवानिवृत्त झालेले तीन पोलीस अधिकारी तपासी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश आले आहेत.यासोबत दोन आणखी अधिकार आहेत. त्याप्रमाणे एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्राधिकरणावर झाली आहे.
वास्तव न्युज लाईव्हने सकाळी नांदेड स्थानिक गुन्हा शाखेतून सेवानिवृत्त झालेले पोलीस निरिक्षक द्वारकादास गोविंदरावजी चिखलीकर यांची नियुक्ती या प्राधिकरणावर झाली अशी बातमी प्रसिध्द केली होती.
त्यानंतर वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीनुसार अजून पाच जणांची नियुक्ती याच प्राधिकरणात झाली आहे. त्यातील पहिले भिमराव नामदेवरावजी शिंगाडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून पोलीस उपअधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या पोलीस सेवा काळात अनेक खडतर सेवापदके प्राप्त केली. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात सुध्दा काम केले होते. भिमराव शिंगाडे हे मुळचे राहणारे परभणी जिल्ह्यातील आहेत.
त्यानंतर पोलीस उपआयुक्त जात पडताळणी विभाग छत्रपती संभाजीनगर येथून सेवानिवृत्त झालेले अनिल नारायणरावजी गायकवाड यांना सुध्दा या प्राधिकरणात तपासी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. यांनी सुध्दा स्थानिक गुन्हे शाखा नांदेडसह दोन वेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेले आहे. सोबत छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेत सुध्दा काम केलेले आहे.
तिसरे अधिकारी बालाजी रघुनाथरावजी सोनटक्के यांना सुध्दा या प्राधिकरणात तपासीक अधिकारी या पदावर नियुक्ती मिळाली आहे. सोनटक्के यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेत काम केलेले आहे.तसेच ते सेवानिवृत्त होताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. बालाजी सोनटक्के यांची सेवानिवृत्त 30 जून 2023 रोजी झाली. भिमराव शिंगाडे यांची सेवानिवृत्ती मार्च 2020 मध्ये झाली आणि अनिल गायकवाड यांची सेवानिवृत्त फेबु्रवारी 2021 मध्ये झाली आहे. यांच्यासोबत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामेश्र्वर थोरात आणि प्रजापती यांनाही या प्राधिकरणात नियुक्ती देण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त मुख्यालय छत्रपती संभाजीनगर शिलवंत नांदेडकर यांनी जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *