नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 वर्ष संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले आहेत. या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी तरुणाई अगदी उत्साहीत असते. पण हे करत असतांना कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचे कृत्य करू नये. कायद्याच्या चौकटीत राहुल प्रत्येकाने आप-आपली जबाबदारी पार पाडावी. जनतेच्या सहकार्याशिवाय आम्ही शांतता राखू शकत नाही असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
राज्याच्या सांख्कीकी विभागाचा अहवाल असे सांगतो की, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत अपघात, आणि मारहाणीचे गुन्हे दाखल होण्याच प्रकार वर्षात सर्वाधिक असतो. कारण वर्ष संपत आहे म्हणून निरोप द्यायचा असतो आणि नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी अनेक जण मद्यधुंद अवस्थेत असतात. मात्र यावेळी अनेक तरुणाईकडून कळत न कळत अपराध होत असतो. काही जणांचा तर अपघात होवून जिवाला दुखापतही होते. तर काही जण वाद निर्माण करून गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडतात. यासाठी पोलीस प्रशासनाला मात्र कायद्याच्या चौकटीत राहुनच ही सर्व प्रकारणे पार पाडावी लागतात. यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा. तसेच कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही असे कृत्य या कालावधीत केले जाऊ नये. पोलीस प्रशासनाच्यावतीने 31 डिसेंबर रोजी शहरात व शहराबाहेर नाकाबंदी केली जात असून या नाकाबंदीत गैरकृत्य करतांना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही यासाठी दिलेल्या विहीत वेळेतच प्रत्येकाने त्या वेळेचे पालन करून घरी जावे आणि जनतेने आम्हाला सहकार्य करावे, जर जनतेला कोठे अडचण आली तर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावा. त्यांच्यासाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. याचबरोबर जवळच्या पोलीस स्टेशन व पोलीस चौकी सोबत संपर्क करावा जेणे करून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राहिल. जनतेने सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.