
नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता मनकोकळेपणानी जगावे त्यांच्यावर कोणतेही दडपण या काळात येणार नाही. आपल्या कुटूंबियांसोबत उर्वरीत आयुष्य आनंदी आणि मनमोकळेपणे जगण्याची संधी खऱ्या अर्थाने आता मिळत आहे. त्यामुळे हा आनंद प्रत्येकाने घ्यावा असे उद्गार अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी व्यक्त केले.
दि.30 डिसेंबर 2023 रोजी नांदेड पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरिक्षक आणि सहा पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांचा कुटूंबियांसोबत पोलीस विभागाकडून यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त समारंभ कार्यक्रम पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे पार पडला. यावेळी अबिनाशकुमार यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देवून त्यांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे, सुखी-समाधानाने आणि आनंदी जिवन जगण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिली. या कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस कल्याण विभागचे पोलीस निरिक्षक एन.एल.रिठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांची उपस्थित होती.
आज पार पडलेल्या सेवानिवृत्त सत्कार समारंभात पोलीस उपनिरिक्षक कुंटूर संजय उमाकांत आटकुरे, पोलीस उपनिरिक्षक नियंत्रण कक्ष रमेश माणिकराव गोरे, पोलीस उपनिरिक्षक वजिराबाद भिमराव चांदु भद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुख्यालय नांदेड साहेबराव बाजीराव आडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुखेड गौतम माणिक कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कुंटूर रमेश मोहनराव निखाते, पोलीस अंमलदार मुख्यालय संजय भुजंगा गोणारकर, पोलीस अंमलदार मुख्यालय वसंत सेवा जाधव आणि पोलीस अंमलदार गुरूद्वारा संरक्षण पथक रामेश्र्वर लक्ष्मण थोटे हे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
