
नांदेड,(प्रतिनिधी)-सागर यादव खून प्रकरणातील 33 क्रमांकाचा फरार आरोपी पकडून नवीन वर्षात आणि आपल्या जन्मदिनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आता सागर यादव खून प्रकरणातील 3 जण आजच पोलीस कोठडीत गेले आहेत.
इतवारा पोलिसांच्या हद्दीत सागर यादव आणि त्याचा भाऊ मोनू यादव या दोघांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आजच न्यायालयाने तीन जणांना 8 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते. यादरम्यान स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरीक्षक उदय खंडेराया यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकाला नगिना घाट परिसरात पाठवले. तेथे त्यांना संतोष भीमराव सोळंके (22) राहणार गायत्री मंदिर जुना मोंढा हा युवक सापडला. याने सुद्धा सागर यादवचा खून झाला तेव्हा तलवारी आल्यानंतर त्या तलवारी घेऊन त्या तलवारीने सागर यादव पर जबरदस्त प्रहार केले होते. असे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते. ज्याच्यामुळेच सागर यादवचा मृत्यू झाला होता.
या संदर्भाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, विलास कदम,रणधीर राजबंशी आणि ज्वालासिंग बावरी या पथकाचे कौतुक केले आहे. पकडलेल्या संतोष भीमराव सोळंकेला पुढील तपासासाठी इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आज आपला जन्मदिन साजरा करण्याच्या सोहळ्यात सामील न होता दत्तात्रय काळे यांनी आरोपी प्रकरणात दाखविलेला रस महत्त्वपूर्ण आहे, आणि त्याची प्रशंसा केली पाहिजे.
संबंधित बातमी……
https://vastavnewslive.com/2024/01/02/सागर-यादव-खून-प्रकरणातील/