नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात आज जवळपास 1078 पोलीस निरिक्षकांच्या जागा रिक्त असतांना सुध्दा महासंचालक कार्यालयाने अभिलेखावर 171 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना त्यांचे पसंतीचे परिक्षेत्र मागविले आहेत. परंतू नियुक्ती 172 लोकांची होणार आहे. त्यातही ज्या ठिकाणी जागा जास्त रिक्त आहेत. त्यात बऱ्याच जागा रिक्त राहणार आहेत. रिक्त जागेच्या तुलनेत फक्त 25.11 टक्के जागा भरल्या जाणार आहेत. 75.89 टक्के जागा रिक्तच राहणार आहेत. शासनाची ही खेळी काय आहे कोण जाणे?
महाराष्ट्र शासनाने रिक्त असलेल्या पोलीस निरिक्षकांची पदे भरण्यासाठी 171 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या पसंतीची परिक्षेत्र कोणती आहेत. याची मागणी मागवली आहे. परिक्षेत्रनिहाय रिकामा जागा पुढील प्रमाणे आहेत. नागपूर-71, अमरावती-21, छत्रपती संभाजीनगर-58, कोकण विभाग-1-6, कोकण विभाग-2-426, नाशिक-32, पुणे-67 अशा एकूण 681 जागा रिक्त असतांना पदोन्नती फक्त 171 जणांना देण्यात आली आहे. हा अभिलेखावरचा विषय आहे. आजच्या स्थितीत महाराष्ट्रात 1078 पोलीस निरिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अशा माहिती प्राप्त झाली आहे.
ज्या 171 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यापैकी पुढीलप्रमाणे वाटणी होणार आहे. नागपूर-18, अमरावती-5, छत्रपती संभाजीनगर-15,कोकण विभाग-1-2, नाशिके-8, कोकण विभाग-2-107, पुणे-17 यांची बेरीज केली तर ही बेरीज 172 होते आहे. मग 171 सहाय्यक पोलीस निरिक्षकांपासून पसंतीचे परिक्षेत्र मागविले आहेत. परंतू प्रत्यक्षात आजच्या तारखेत राज्यात 1078 पोलीस निरिक्षकांची पदे रिक्त आहेत. हा खेळ काय चालवला आणि मनुष्यबळाची कमरता या नावावर पोलीस विभागाला असलेला नेहमीचा त्रास याही पदोन्नत्यानंतर सुरूच राहणार आहे. या शिवायही अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या शिल्लक आहेत. त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
1078 पोलीस निरिक्षकांच्या जागा राज्यात रिक्त; पदोन्नतीमुळे भरणार फक्त 171