नांदेड(प्रतिनिधी)-देशी दारुच्या 90 एमएल मापाच्या 8900 बॉटल्या चोरट्यांनी चोरतांना त्या देशी दारु दुकानातील रोख रक्कम 25 हजार रुपये सुध्दा चोरली आहे.
बालाजीसिंह देवमनसिंह परमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते चंद्रलोक हॉटेलच्या शेजारी असलेल्या गांधीनगर भागात देशी दारु दुकानावर काम करतात. दि.2 जानेवारी रात्री 10 वाजेपासून ते 3 जानेवारीच्या पहाटे 7 वाजेदरम्यान देशी दारुच्या दुकानाला लावलेले कुलूप तोडून त्यातील 90 एमएल मापाच्या 8900 बॉटल्या म्हणजे देशी दारुचे 89 बॉक्स प्रत्येक बॉक्सची किंमत 3030 रुपये असा आणि त्या दारु दुकानातील गल्यात असलेले 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 94 हजार 670 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
विमानतळ पोलीसांनी तक्रार आल्यानंतर हा गुन्हा 3 जानेवारी रात्री रात्री दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एन.जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
देशी दारुच्या 8 हजार 900 बॉटल्या चोरल्या