नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर आता पोलीस विभागातील पोलीस अंमलदार ते पोलीस अधिक्षक यांच्या बदल्यांचे आदेश 9 जानेवारीपर्यंत पुर्ण करावे असे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी निर्गमित केले आहे.त्यामुळे आता कोण-कोण खलबत करून आपले पद वाचवतो यासाठी आता फक्त सहा दिवस उरले आहेत.
भारतीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बदल्या करण्याबाबतचे एक मार्गदर्शक पत्र 21 डिसेंबर 2023 रोजी जारी केले आहे. त्यास अनुसरून 3 जानेवारी 2024 रोजी अपर पोलीस महासंचालकांनी नवीन पत्र जारी केले आहे.अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने यापुर्वी सुध्दा 4 सप्टेंबर 2023 रोजी जारी केलेल्या पत्राचा संदर्भ 3 जानेवारी 2024 च्या पत्रात उल्लेखीत केला आहे. या पत्रासोबत निवडणुक आयोगाने जारी केलेल्या सुचनांची सहा कागदपत्रे सोबत जोडली आहेत.
पोलीस अधिक्षक यांच्या स्तरावर लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदली बाबत नवीन पदस्थापना करण्याची कार्यवाही 9 जानेवारीपर्यंत पुर्ण करायची आहे. ज्या अधिकाऱ्यांचा बदल पोलीस अधिक्षकांच्या हातात नाही त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरिक्षक किंवा पोलीस उपमहानिरिक्षक यांच्याकडे 9 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे.
लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने परिक्षेत्रीय स्तरावर नवीन बदल्या आणि नवीन पदस्थापना देण्याचे आदेश सुध्दा 12 जानेवारी 2024 पर्यंत पुर्ण करायचे आहे. ज्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस निरिक्षक या पदांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला ज्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव स्वत: करणे अशक्य आहे अशांचा प्रस्ताव पोलीस अस्थापना मंडळ क्रमांक 2 यांच्याकडे निर्णयासाठी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवायचा आहे ते काम सुध्दा 12 जानेवारीपर्यंत पुर्ण करायचे आहे.
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिक्षक, पोलीस अधिक्षक यांची बदली करणे आवश्यक आहे त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 यांच्याकडे निर्णयासाठी पाठवायचे आहे.
पोलीस आयुक्त स्तरावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक ते पोलीस उपआयुक्त अधिकाऱ्यांच्या बदली आणि नवीन पदस्थापनेची कार्यवाही 12 जानेवारी 2024 पर्यंत पुर्ण करायची आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे पोलीस आयुक्त स्तरावर अशक्य आहे त्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयातील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1/2 यांच्याकडे पाठवायचे आहे.
पोलीस आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरिक्षक, परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरिक्षक यांनी आस्थापना मंडळ क्रमांक 2 साठी या कार्यालयास प्रस्ताव पाठवितांना त्या अधिकाऱ्यांना परिक्षेत्र किंवा पोलीस आयुक्तालयात का सामावून घेता येत नाही याचे कारण नमुद करून पद निहाय परिपुर्ण प्रस्ताव सादर करावे. हा प्रस्ताव कसा सादर करावा याचे प्र पत्र सुध्दा या आदेशात जोडले आहे.
पोलीस अधिक्षक यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पदनिहाय, जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या इतिवृत्तासह 10 जानेवारी 2024 पर्यंत तसेच पोलीस आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरिक्षक, परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरिक्षक यांनी केलेल्या पदनिहाय कार्यवाहीचा अहवाल त्यांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या इतिवृत्तासह 13 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन क्रमांक 3 यांना ई-ऑफीस प्रणालीद्वारे किंवा खास दुतामार्फत पाठवायचे आहे. भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांचे पालन करतांना काही अडचन आल्यास पोलीस महासंचालक कार्यालयातील लक्ष वेध कार्यासन क्रमंाक 3 यांना 9 जानेवारी 2024 पुर्वी कळवायचे आहे.
पोलीस महासंचालकांचे हे आदेश जारी झाल्यानंतर आता आपले पद टिकवून ठेवण्यासाठी काही महाभागांना नक्कीच कसरत करावी लागणार आहे. या कसरतीमध्ये त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले तर त्यांची कला उत्कृष्ट मानली जाईल नसता तो एक अपघात होता असे त्यांना स्वत:ला समजावे लागेल.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन पदस्थापना 9 जानेवारीपर्यंत पुर्ण कराव्यात-पोलीस महासंचालकांचे आदेश